श्री जानाई मातेचे सेवेकरी

परंपरेने सेवा करत असलेले सेवेकरी नित्यनेमाने देवीची सेवा करत असतात.यामध्ये प्रामुख्याने पाटील,गुरव,भोई, मशालजी माळी,यांचा समावेश होतो. नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते.प्रत्येक सोमवती अमावस्येला देवीला निरा नदी स्नानासाठी सरडे या शेजारच्या गावात पालखीतून नेऊन स्नान घातले जाते.यामध्ये अनेक भाविक सहभागी होत असतात. प्रत्येक पौर्णिमेला देवीची पालखी मंदिर प्रदक्षिनेसाठी बाहेर येते ,विविध देव देवतांच्या आरत्या केल्या जातात.पाटील, गुरव, मशालजी,भोई व इतर सेवेकरी ग्रामस्थ उपस्थित असतात.

देवीचा मुख्य मान

देवीचा मुख्य मान परंपरेने निंबाळकर ,पाटील घराण्याकडे आहे.राजाळे गावातील जानाई देवी उत्सवात पाटीलकीचा मान दौलतरावजी निंबाळकर (पाटील) यांच्याकडे होता. देवीच्या उत्सवातील सर्व पूजाविधी, अभिषेक त्यांच्याकडून केले जात. श्रींची मूर्ती पूजा, विधी, अभिषेक, दागिने या सर्व विधींचा मान संभाजीराव निंबाळकर यांच्याकडे आहे.

पूजा अर्चेचा मान

मातेच्या पूजा अर्चेचा मान गुरव कुटुंबाकडे आहे.गुरव कुटुंब देवीची नित्यनेमाने पूजा अर्चा करत असतात.परंपरेने सेवा करत असलेले गुरव कुटुंब नित्यनेमाने देवीची सेवा करत असतात.ही परंपरा आत्त्ता त्यांची पुढची पिढी करत आहे.

पालखीचा मान( खांदेकरी )

भोई समाजाकडे पालखीचा मान आहे.प्रत्येक,नवरात्री उत्सव व देवीचा छबिण्यात व इतर दिवशी नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते.पौर्णिमेला देवीची पालखी मंदिर प्रदक्षिनेसाठी बाहेर येते तेव्हा पालखीचा मान भोई समाजाकडे आहे.

मशालीचे मानकरी

भोईटे((चांभार)कुटुंबाकडे मशालीचा मान आहे.प्रत्येक नवरात्री उत्सव व देवीचा छबिण्यात व इतर दिवशी नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते .पौर्णिमेला देवीची पालखी मंदिर प्रदक्षिनेसाठी बाहेर येते तेव्हा मशाल मानमान (चांभार) कुटुंबाकडे आहे

फुले अर्पण मान

अब्दागिरी (माळी) कुटुंब मातेच्या पूजा अर्चे साठी लागणारी फुले माळी कुटुंब नित्य नेमाने देतात. रोज सकाळी ताजी फुले मातेला अर्पण केली जातात.परंपरेने सेवा करत असलेले सेवेकरी नित्यनेमाने देवीची सेवा करत असतात.

ढोल वाजवण्याचा मान

घटस्थापना,नवरात्री उत्सव व देवीचा छबिण्यात व इतर दिवशी नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते.तेव्हा एका मुस्लिम कुटुंबाला आरतीच्या वेळी ढोल वाजवण्याचा मान आहे..

श्री जानाई माता

मंदिराची वैशिष्ट्ये

मंदिराचे प्रवेशद्वार

मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूला मोठा लाकडी दरवाजा आहे.तो एखाद्या किल्याच्या प्रवेश द्वारा सारखा भासतो.दरवाज्याच्या डाव्या ,उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.याच दरवाज्याच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे.

हेमाडपंथी बांधकाम

श्री जानाई देवीचे मुख्य मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे.मंदिर संपूर्ण दगडात असून हेमाडपंथी बांधणीचे आहे.बांधकामामध्ये चुना वापरलेला दिसतो,कारण चुन्याच्य्या घाण्याचे अवशेष मंदिरात आढळतात . मंदिराच्या बांधकामात कुठेही लाकडाचा वापर केलेला दिसत नाही.

पाण्याच्या बारवा

मंदिराच्या पूर्वेला दोन पाण्याच्या बारवा आहेत.त्याचे बांधकाम पूर्ण दगडात आहे.बारवेचे वैशिष्ट म्हणजे एका बारवेचे पाणी भाविक पिण्यासाठी करतात तर दुसऱ्या बारवेतील पाण्याचा उपयोग अंघोळीसाठी केला जातो.अनेक भाविक हे पाणी अंगाला खरूज, नायटा झाला असेल तर हे पाणी अंगाला लावतात..

ढोल वाजवण्याचा मान

जानाई देवीच्या वार्षिक उत्सव मधील एक महत्वाचा उत्सव म्हणजे घटस्थापना. नवरात्री उत्सव व देवीचा छबिण्यात व इतर दिवशी नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी देवीची आरती केली जाते.एका मुस्लिम कुटुंबाला आरतीच्या वेळी ढोल वाजवण्याचा मान आहे.

श्री जानाई माता

मंदिर परिसरामध्ये असलेली मंदिरे

श्री जानाई माता मंदिर परिसरामध्ये मुख्य मंदिरा पासून पूर्वीकडे लहान-मोठी मंदिरे आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

महादेव मंदिर

जानाई माता मंदिराच्या पूर्वेला महादेवाचे एक जुने मंदिर आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची मोठी पिंड आहे . महादेव मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे.मंदिर संपूर्ण दगडात असून हेमाडपंथी बांधणीचे आहे.बांधकामामध्ये चुना वापरलेला दिसतो,कारण चुन्याच्य्या घाण्याचे अवशेष मंदिरात आढळतात.सोमवार रविवार राजाळे व आसपास गावातील अनेक भाविक भक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

जानाई मातेचे मूळ मंदिर

जनाई मातेचे मूळ मंदिर मुख्य मंदिरापासून पूर्वेकडे आहे. हे मंदिर जनाई मातेचे मूळ मंदिर आहे असे सांगितले जाते. या मंदिरामध्ये जनाई मातेची दगडी मूर्ती आहे. मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे.जनाई मातेचे मूळ मंदिर मुख्य मंदिरापासून पूर्वेकडे आहे.अनेक भाविक भक्त पहिल्यांदा जनाई मातेचे दर्शन घेतात व नैवेद्य दाखवतात.

यशवंत बाबा मंदिर

यशवंत बाबा मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे या मंदिरामध्ये यशवंत बाबांची पाषाण मूर्ती आहे . मंदिराचे तोंड उत्तरेकडे आहे हे मंदिर जानाई मातेच्या मूळ मंदिराच्या शेजारी आहे. अनेक भाविक भक्त पहिल्यांदा यशवंत बाबाचे दर्शन घेतात आणि यशवंत बाबांना शेला आणि पागोटा वाहतात व नैवेद्य दाखवतात.