मंदिराविषयी

नवसाला पावणारी राजाळेची जानुबाई ...

फलटण येथील ऐतिहासिक नाईक निंबाळकर या राजघराण्याचे व महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत म्हणजे राजाळे तालुका फलटण येथील श्री जानाईमाता म्हणजेच जानुबाई. जानाई माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते.नवरात्र आणि श्रावण महिन्यामध्ये हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.देवीचे मंदीर हे बाराव्या शतकातील असून पूर्वभिमुखआहे.मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूला मोठा लाकडी दरवाजा आहे.तो एखाद्या किल्याच्या प्रवेश द्वारा सारखा भासतो. दरवाज्याच्या डाव्या ,उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.याच दरवाज्याच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे.दगडी पायऱ्या चढून वर गेल्यावर भला मोठा बांधीव दगडी बांधकाम असलेला ओटा आहे.त्या ओट्यावर तुळशी वृंदावन आहे. मंदिराला चारी बाजूंनी तटबंदी असून मंदिरात असणाऱ्या दगडी ओवऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात.मंदिराच्या बांधकामात कुठेही लाकडाचा वापर केलेला दिसत नाही .मंदिराची आणि तटबंदीची पडझड 11 डिसेंबर 1967 रोजीच्या कोयना येथे झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने झाली होती. मंदिराचे बांधकाम पुन्हा 1979 साली करण्यात आले. त्यामध्ये मंदिराचा भार जास्त असल्यामुळे मंदिर पाठीमागच्या बाजूला तीन फूट खचले आहे. मंदिराचे शिखर जमिनीपासून ऐंशी ते नव्वद फूट उंचीचे आहे. मंदिराच्या पुढील बाजूला गणपतीची भव्य मूर्ती स्वागत करण्यासाठी बसवलेली आहे. मंदिर जानाई सभागृह आणि मंगल कार्यालय म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिराविषयी
श्री जानाई माता

मंदिरामध्ये साजरे केले जाणारे वार्षिक उत्सव

श्री जानाई मातेचे वार्षिक उत्सव हे नित्यनियमने नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट चे मार्गदर्शनाखाली चालत असतात.देवीच्या उत्सवाचे आकर्षण म्हणजे देवीचे सोन्याचे मुकुट. ते इतर वेळी फलटण संस्थानाकडे ठेवलेले असतात. यात्रेच्या, उत्सवाच्या वेळी सोने व सोन्याचे मुकुट पोलिस बंदोबस्तात येतात आणि बंदोबस्तातच उत्सव असेपर्यंत मंदिरात राहतात.

1. देवीची वार्षिक यात्रा

देवीची वार्षिक यात्रा चैत्र महिन्यात सप्तमी व अष्टमी या दिवशी होते .यात्रा काळात देवीचा थाट बघण्यासारखा असतो.देवीला पुरातन काळातील दागदागिने चढवले जातात. यात्रेच्या मुख्य दिवशी देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.देवीला ग्रामस्थां मार्फत साडी चोळी नेसवली जाते. येथील देवीचा मुख्य मान परंपरेने निंबाळकर ,पाटील घराण्याकडे आहे.पहाटे वाजत गाजत देवीचा छबिना निघतो.गावात देवीची पालखी आल्यानंतर देवीला पाटील वाड्यात स्नान घातले जाते.ग्राम प्रदक्षिनेनंतर भैरोबा मंदिरात छबिण्याची सांगता होते. अनेक मानाच्या सासन काठ्या छबिण्यात असतात.गुलाल उधळून ,फटाके वाजवून ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत केले जाते.दुसऱ्या दिवशी सकाळी नवसाची बकरी कापली जातात पै पाहुणे येतात गाव गजबजून जाते. दिवसभर मनोरंजनासाठी तमाशा असतो.शेवटी कुस्त्या होतात व यात्रेची सांगता होते.

2.वार्षिक उत्सव घटस्थापना

जानाई देवीच्या वार्षिक उत्सव मधील एक महत्वाचा उत्सव म्हणजे घटस्थापना निंबाळकर ,पाटील घराण्यातील व्यक्तींच्या हस्ते देवीची घटस्थापना केली जाते. व देवीचा नवरात्र उत्सव सुरू होतो.दररोज नव दिवस सकाळ संध्याकाळी देवीची पालखी मंदिर प्रदाक्षिनेसाठी निघते .परंपरेने सेवा करत असलेले सेवेकरी नित्यनेमाने देवीची सेवा करत असतात.यामध्ये प्रामुख्याने पाटील,गुरव,भोई, मशालजी माळी,यांचा समावेश होतो. हा सोहळा बघण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक मंदिरात गर्दी करतात.संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.नवमी दिवशी पहाटे होम हवन विधी करून नवरात्राची सांगता होते. दसऱ्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक केला जातो .पुरातन काळातील दागदागिने चढवले जातात. देवीची पालखी सिमोलनघनासाठी आपल्या लवाजम्यासह निघते, व परत मंदिरात येते.लोक एकमेकांना सोने देऊन शुभेच्छा देतात.

3. श्रावण यात्रा

श्रावण महिन्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक असते.खेळणी व मेवा मिठाईची दुकाने मंदिर परिसरात असतात.श्रावण, ज्याला सावन असेही म्हणतात, हा हिंदू चंद्र कॅलेंडरचा पाचवा महिना आहे, जो सामान्यतः जुलै आणि ऑगस्ट दरम्यान येतो. हिंदूमध्ये, विशेषतः भगवान शिवभक्तांमध्ये याला खूप आदर आहे. "श्रावण" हे नाव श्रावण नावाच्या नक्षत्रावरून आले आहे, जो या महिन्यात प्रबळ असतो.श्रावण महिन्यामध्ये हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या महिन्यात अनेक भक्त देवीचा उपवास करतात भक्ती करतात , देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.श्री जानाई मातेचे वार्षिक उत्सव हे नित्यनियमने नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट चे मार्गदर्शनाखाली चालत असतात.

श्री जानाई माता

मंदिर संस्थान विविध प्रकारच्या सेवा व सुविधा

पूजा विधी

श्री जानाई माता मंदिर सकाळी ६.०० वाजेपासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. अभिषेक, पूजा, इत्यादीसाठी ट्रस्ट कार्यालयात चौकशी करावी..

देणगी

श्री जानाई माता देवीस भाविक रोख रक्कमेस सोने, चांदी व इतर वस्तूंच्या स्वरुपात देणगी अर्पण करतात. सदरची प्राप्ती होणारी देणगी स्वीकारली जाते.

स्वच्छता व्यवस्था

श्री जानाई माता मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी आहेत.

पिण्याचे पाणी

श्री जानाई माता मंदिरामध्ये येणाऱ्या भावीक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मंदिरामध्ये पाण्याच्या दोन टाक्या आहेत त्यामध्ये पाणी स्वच्छ आहे पिण्यायोग्य आहे..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले

ऐतिहासिक गाव राजाळे .

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राजाळे हे गाव आहे. राजाळे हे गाव पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात येते . ते पुणे विभागात येते. राजाळे हे गाव जिल्हा मुख्यालय सातारा पासून पूर्व दिशेला ७९ किमी अंतरावर आहे. फलटण पासून १७ कि.मी. राज्याची राजधानी मुंबईपासून २४४ किमी आहे. राजाळे गावाचा पिन कोड 415523 आहे आणि पोस्टल मुख्य कार्यालय शुक्रवार पेठ फलटण आहे. राजाळे गावापासून टाकळवाडे (४ किमी), पिंप्रद (४ किमी), मठाचीवाडी (५ किमी), सरडे(५ किमी), साठे (६ किमी) ही राजळे जवळची गावे आहेत. राजळे उत्तरेकडे बारामती तालुका, दक्षिणेकडे माण तालुका, पूर्वेकडे इंदापूर तालुका, पूर्वेकडे माळशिरस तालुक्याने वेढलेले आहे. फलटण, बारामती, दौंड, म्हसवड ही राजळेपासून जवळची शहरे आहेत.मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात.

  • गावच्या सरपंच :सौ.स्वाती दोंदे
  • उपसरपंच: शरद निंबाळकर
श्री जानाई माता मंदिर

पर्यटकांचे अभिप्राय