मंदिराचा इतिहास

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत म्हणजे राजाळे येथील श्री जानाईमाता म्हणजेच जानुबाई.

मानवी जीवनात शक्ति उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचाच प्रत्यय आपल्या संस्कृतीमध्ये दुर्गेची विविध रूपे आढळतात. सर्व देवतांच्या शक्तिरूप मूर्तीला आदीशक्ती असे नामाभिमान देऊन सर्वश्रेष्ठ ब्रम्हांडनायिका म्हणून गौरविण्यात आले. ब्रम्हा, विष्णु, शिव यांची प्रेरक शक्ति म्हणजे आदीमाया जगदंबा होय. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती हे दुर्गेचे मुख्य अवतार मानले जातात. यापैकी श्री महाकाली हे तमोगुण ( शरीरबल), श्री महालक्ष्मी हे रजोगुण ( संपत्तीबल) व श्री महासरस्वती हे सत्वगुण ( ज्ञानबल ) यांचे प्रतिक मानले जाते. श्री देवी भागवत, श्री देवी उपनिषद्, देवी पुराण, देवी महात्म्य अशा विविध ग्रंथांमध्ये आदीशक्तीचे विस्तृत वर्णन आढळते. महाराष्ट्रात कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजा भवानी, माहूरगडची श्री रेणुका आणि वणीची श्री सप्तश्रृंगी अशी साडेतीन शक्तिपीठे स्थानापन्न आहेत. परंतू याव्यतिरीक्त इतरही अनेक शक्तिपीठे आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेने संस्कृतीचा पारंपारिक वारसा जोपासत उभी आहेत. यापैकीच असंख्य भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेले राजाळे पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री जनाई माता मंदीर होय. श्री जनाई माता मंदीराच्या इतिहासाबद्दल पुराण् ग्रंथांमध्ये दंतकथा, अख्यायिका प्रचलित आहेत. तसेच मंदीर परीसरात असणारे शिलालेख, जुनी कागदपत्रे, विविध उत्सव या माध्यमातून देखील मंदीराचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेता येते. त्याचप्रमाणे मंदीराच्या बांधकाम शैलीवरून देखील मंदीराचे कार्यकाळाविषयी आकलन करता येते.मंदिर गावाच्या पूर्वेला आहे. ते इसवी सन 1600 (शके 1522) च्या अगोदर बांधण्यात आले आहे. जानाई मंदिराचा इतिहास शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदरचा आहे. देवस्थानाला सापडलेल्या एका ताम्रपटावर श्री जानाई मंदिर इसवी सन 1689 (शके 1611) मधील असल्याचा उल्लेख आहे.मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र तो पुणे पुराभिलेख विभागाकडे मोडी लिपीत उपलब्ध आहे असे सांगतात.

मंदिराचा पूर्ण फोटो
श्री जानाई देवीचे

मुख्य मंदिराविषयी


श्री जानाई देवीचे मुख्य मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे.मंदिर संपूर्ण दगडात असून हेमाडपंथी बांधणीचे आहे.बांधकामामध्ये चुना वापरलेला दिसतो,कारण चुन्याच्य्या घाण्याचे अवशेष मंदिरात आढळतात.पूर्व बाजूला मोठ्या दोन दगडी दीपमाळा असून नवरात्रा मध्ये त्या प्रजवलित केल्या जातात..

सहा वेगवेगळ्या नक्षीकाम असलेल्या दहा दगडी खांबावर मंदीर उभे असून मंदिराचे भरीव शिखर जवळ जवळ चाळीस फूट उंच आहे.मंदिराच्या शिखरावर विविध देव देवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून आजही त्या सुस्थितीत आहेत.

चाळीस फूट दगडी तटबंदी मंदिराला चारही बाजूंनी आहे. आतील बाजूस दगडी फरशीकाम आहे. मंदिराचे खांब दहा फूट उंचीचे आहेत. गाभाऱ्याचे काम मार्बलमध्ये केलेले आहे. मंदिराच्या समोर पूर्वेला लाकडी पंचवीस फूट उंच असा भव्य दरवाजा आहे. मंदिराच्या आतील बाजूस मारूती, गणपती, दत्तात्रेय, विठ्ठल-रुक्मिणी यांची छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराचे बांधकाम पाहण्यासारखे आहे.

मंदिराच्या पाठीमागे गुहा आहे. ती वाट कोठे जाते याबद्दल स्पष्ट माहिती नाही. परंतु मौखिक माहितीवरून ती गुहा शिखर शिंगणापूरकडे किंवा फलटणच्या राजवाड्यात जात असावी.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळया गंडकी शिलेपासून बनवलेली एक आणि गारे पासून तयार करण्यात आले ली एक अशा दोन मूर्ती व एक पाषाण दिसून येतो.दोन्ही मूर्ती ह्या वाघावर बसलेल्या असून त्या महिषासुर मर्दिनी रूपातील आहेत.देवीच्या हातात त्रिशूळ आहे

10000+

वार्षिक पर्यटक भेट

5+

वार्षिक उत्सव

10+

लहान मोठी मंदिरे

नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट फलटण.

श्री जानाई मातेचे वार्षिक उत्सव हे नित्यनियमने नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट चे मार्गदर्शनाखाली चालत असतात. मंदिराचेही सर्व अधिकार नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहेत. फलटण संस्थानाचे अधिपती मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर श्रीमंत मालोजीराजे आणि सध्याचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद) यांची जमीन राजाळे गावात आहे. जानाई देवी निंबाळकर घराण्याची कुलस्वामिनी असल्यामुळे सर्व राजघराणे जानाई मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

अध्यक्ष-महाराष्ट्र विधान परिषद

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

माजी अध्यक्ष-जिल्हा परिषद सातारा

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण

श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर

अध्यक्ष अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण

श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर

संचालक गोविंद दूध

श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर

फलटण पंचायत समिती सभापती